SOME OF OUR PRODUCTS
ACHIEVEMENTS
PLENTON PRODUCTS
RESULTS
TESTIMONIALS

PLENTON अॅग्रो टेक्नॉलॉजी सोबत मी माझ्या टोमॅटो प्लॉटचे नियोजन केले होते. अगदी सुरुवातीपासून योग्य नियोजन वातावरणीय बदलानुसार वेळापत्रक तसेच PLENTON श्रेणीच्या च्या उत्पादनांचा वापर या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. या श्रेणीतील गुवात्तापूर्ण उत्पादने प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला हवीत असं माझं प्रामाणिक मत आहे.धन्यवाद PLENTON.
- श्री. योगेश पुसावळे,दिघंची,आटपाडी,जि.सांगली.
माझ्या शेतातील हरभरा पिकाचे उच्च उत्पादन घेण्यात PLENTON श्रेणीचा मोलाचा वाटा आहे.माझ्या शेतातील २.७ एकर क्षेत्रावरील हरभरा पिकात सुमारे ३९ क्विंटल इतके उत्पादन म्हणजे एकरी जवळपास १४.४४ क्विंटल उत्पादन मिळाले. यासोबतच PLENTON कडून नेहमीच शेतीसंबंधी मार्गदर्शन मिळत आले आहे.धन्यवाद PLENTON.
- श्री. प्रताप आवळेकर(इनामदार),अरळहट्टी,अथणी,जि.बेळगाव.
माझ्या शेतात ऊस,द्राक्षे व इतर फळ व भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतो.यावर्षी मला PLENTON बद्दल समजले.त्यामुळे मी माझ्या शेतातील द्राक्ष पिकात PLENTON DS सारख्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा वापर केला.याचा फायदा असा झाला कि बागेत छाटणीनंतर एकसमान फुट निघण्यास मदत झाली. तसेच, पांढऱ्या मुळांची वाढ होऊन अन्नद्रव्यांचे अपटेक वाढून उपलब्धता वाढली.वेलींत एकप्रकारचे चैतन्य दिसून आले.द्राक्षात मी प्रत्येक अवस्थेत याचा आवश्यकतेनुसार वापर केला.सोबत माझ्या टोमॅटो प्लॉटमध्येही याचे उत्तम परिणाम दिसून आले व उत्पन्नाच्या वाढीसोबत गुणवत्ताही मिळाली आणि तेवढाच चांगला मालाला दर भेटला.माझ्यासारख्या इतर सर्व शेतकरीवर्गाने याचा जरूर वापर करावा असे मला वाटत्ते.धन्यवाद PLENTON.
- श्री. काकासो नरुटे,सलगरे,मिरज,जि.सांगली.
मिरची पिकातील थ्रीप्स या किडीमुळे तसेच उनामुळे पिकावर जैविक व अजैविक प्रकारचा ताण आलेला होता. त्यामुळे मी PLENTON च्या मार्गदर्शनाखाली उत्पादांचा वापर केला.पिकावरील पूर्ण ताण कमी झाला व पीकात पुन्हा हिरवापणा आला.
- शरद ठोंगे,उपळाई(ठोंगे),बार्शी,जि.सोलापूर.
माझी फुलशेती आहे मोगरा या पिकाच्या उत्पन्नासाठी मी सर्व प्रकारचे प्रयत्न केले ; पण अपयशी. त्यानंतर मला PLENTON बद्दल माहिती मिळाली.मी त्यानुसार PLENTON उत्पादांचा वापर केला. फुलांच्या वजनात कमालीची वाढ दिसून आली.
- श्री. रणजीत भंडलकर,दौंड,जि.पुणे.
द्राक्ष पिकातील PLENTON च्या वापराने वेलींचा अपटेक वाढण्यास मदत झाली.तसेच पांढऱ्या मुळांची संख्या वाढली.
- श्री. दिलीप पाटील,दत्तनगर(झुरेवाडी),कवठे महांकाळ,सांगली.



















